बारामती:
बारामती दर्पण (प्रतिनिधी):
पुणे जिल्हा बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप , रेवणनाथ दारवटकर, माऊली दाभाडे हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून बारामतीतून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर व दत्तात्रेय येळे सर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. यासाठी बारामतीतून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधून या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केल्याने तालुक्यातील सर्व स्तरातून सार्थ निवड झाली असल्याचे मत येत आहे. या निवडणुकीसाठी 22 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. तत्पूर्वी आज राष्ट्रवादीकडून इतर मागास प्रवर्गातून संभाजी नाना होळकर व भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गा मधून दत्तात्रेय वेळेस सर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
संभाजी नाना होळकर हे सध्या बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून दुसरे उमेदवार दत्तात्रेय येळे सर यांनी यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक पद भूषवले आहे.
बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता बारामती तालुक्यातील तीन संचालक जिल्हा बँकेवर असणार आहेत.
बारामतीतून सार्थ निवड....
पुणे जिल्हा बँकेत बारामती मधून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबरोबरच राष्ट्रवादीकडून तालुक्यातून सर्व सामान्यांना बरोबर घेऊन जाणारे संभाजी नाना होळकर व दत्तात्रेय येळे सर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संभाजी नाना होळकर यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून त्यांनी याआधी गावचे सरपंच, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, जिल्ह्याचे बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा सरचिटणीस, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष, डी पी डी सी सदस्य, तीन ट्रम तालुका अध्यक्ष, एवढी पदे भूषवली आहेत. तर दत्तात्रेय येळे यांनी यादी जिल्हा बॅंकेचे संचालक पद भूषवले आहे. त्यांची ही निवड सार्थ असल्याचे मत तालुक्यातून व्यक्त होत आहे.
Post a Comment