कोऱ्हळे बुद्रुक (प्रतिनिधी)
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व अजित विकास सोसायटीचे चेअरमन नानासो थोपटे यांनी थोपटेवाडी गावातील जवळपास ३० गरीब कुटुंबांना प्रत्येकी ४ किलो साखर दिवाळीनिमित्त वाटप केली आहे. सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले नानासो थोपटे यांनी दिवाळीत ही भेट दिल्याने गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. नुकतेच या साखरेचे वाटप थोपटेवाडीतील कुटुंबांना करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच कल्याण गावडे,ग्रामपंचायत सदस्य संतोष खांडेकर,दत्ता  बनकर,तुषार थोपटे,धनंजय पडवळ,पत्रकार सचिन वाघ, संतोष शिंदे, गणेश शिंदे, अभिषेक नामदास, इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post