बारामती (प्रतिनिधी) :
  बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी  येथील  उपसरपंच प्रमोद  दिलीप जगताप यांच्या  विरूध्द अविश्वास ठराव  संमत झाला होता . या  अविश्वास ठरावा विरोधात जगताप यांनी  पुणे  जिल्हाधीकारी यांकडे अपील केले होते . यानुसार    दि  १ नोव्हेंबर   रोजी जगताप यांचे उपसरपंच पद  कायम ठेवण्याचा आदेश  जिल्हाधीकारी  दिला  
 आहे .
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी हे  एक दुष्काळी गाव पण दुष्काळाशी सामना करीत समृद्धी जलसमृद्ध आदर्श गाव म्हणून संपुर्ण राज्यात  प्रसिद्धी मिळवली . येथील ग्रामपंचायत सदस्यांनी १ ऑगस्ट रोजी सभा घेऊन उपसरपंच प्रमोद दिलीप जगताप यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत केला होता . या ठरावा विरोधात ६ सप्टेंबर  रोजी   जगताप यांनी जिल्हाधीकारी यांकडे  अर्ज  दाखल केला  होता . 
अर्जदार व जबाब देणार यांना नोटीसा काढुन आपापली  बाजु मांडण्याची संधी जिल्ह्याधीकारी यांनी  दिली होती .जगताप यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर तलाव सु शोभीकरण ,  नळ पाणी पुरवठा योजना ,रस्ते  , बोटींग आदी साडेचार कोटींची विकास कामे केली होती .  यामुळे   राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनीही उपसरपंचांच्यां कामाचे कौतुक केले होते .मात्र ग्रामपंचायत  सरपंच व सदस्यांनी  एकत्र येऊन प्रमोद यांच्यावर  अविश्वास  ठराव दाखल केला होता . विकास कामे होऊनही अविश्वास दाखल केल्यामुळे  जगताप गटाचे कार्यकर्ते नाराज होते .
  दाखल झालेल्या अविश्वास ठरावा विरोधात ६ सप्टेंबर  रोजी जिल्हाधीकारी यांकडे अपील केले होते .यानंतर दोन्ही बाजु ऐकुण घेतल्यानंतर ग्रामपंचायत अधीनियम १९५९ चे कलम ३५ (३ , ब ) अन्वये  जिल्हाधीकारी पुणे यांनी उपसरपंच जगताप यांच्या विरोधात संमत झालेला ठराव रद्दबातल केला आहे .
 जिल्हाधीकारी  यांच्या या निर्णयाचे जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन स्वागत केले .

Post a Comment

Previous Post Next Post