कोऱ्हाळे बुद्रुक (प्रतिनिधी)
बारामती तालुक्यातील बजरंगवाडी येथे दि. 06/10/2021 रोजी क्रांँपसँप अंतर्गत सोयाबीन पिक शेतीशाळा व शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
          बारामती तालुक्यातील बजरंगवाडी येथे खरीप हंगाम सन-2021-22 मध्ये 18 मे 2021 पासून सोयाबीन या पिकांची शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात येत आहे. बजरंगवाडी येथील सोयाबीन उत्पादक 25 शेतकऱ्यांची निवड करून दर 15 दिवसांनी 1 वर्ग असे एकूण 10 शेतीशाळा वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिकाच्या पूर्व मशागती पासून , उगवण क्षमता तपासणी, वाण निवड, बिज प्रकिया, बी बी एफ पेरणी, किड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, काढणी,मळणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, विक्री व्यवस्था, व प्रकिया उद्योग या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 
             आज संपन्न झालेल्या शेतीशाळेच्या शेतीदिना निमित्त शेतीशाळेच्या सर्व वर्गाचा आढावा व शेतकऱ्यांचे मनोगत घेण्यात आले. यावेळी मंडल कृषि अधिकारी- हिंदूराव मोरे यांनी सोयाबीन उत्पादनाची अष्टसूञे, सेंद्रिय शेती याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पी एस माने- कृषि पर्यवेक्षक यांनी म ग्रा रो ह यो, महाडिबीटी व रब्बी हंगामातील अनुदान तत्वावरील बियाणे वाटप या विषयी मार्गदर्शन केले. 
याशेतीशाळेचे नियोजन उपविभागीय कृषि अधिकारी - मा. श्री वैभव तांबे साहेब व तालुका कृषि अधिकारी - मा. सौ Supriya बांदल मँडम, यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. 
        शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषि सहाय्यक - राहुल भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. आजच्या शेतीशाळेला शेतकरी गटाचे सर्व सदस्य,सो स सा कारखान्याचे मा. संचालक- मा. श्री नानासो खलाटे, वि का स सोसायटीचे चेअरमन- मा. श्री महादेव साबळे, अशोक खलाटे, रविंद खलाटे व कृषि विभागाचे रणजित धुमाळ, कांबळे मँडम, कोकणे मँडम उपस्थित होते. 
       सूत्रसंचलन राहुल भोसले यांनी केले तर आभार रविंद खलाटे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post