दौंड (प्रतिनिधि)
प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेस डॉक्टरकडूनच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील यवत येथे घडलीय..याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पूजा गोरख दळवी असे मारहाण झालेल्या गरोदर महिलेचे नाव असून त्यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे..
प्रसूती कळा येत असल्याने ही महिला यवत येथील जयवंत हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झाली होती..त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या महिलेस तोंडावर,डोक्यावर,हातावर,मांडीवर,ओठांवर चापटीने आणि बुक्क्याने अमानुष मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे...ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या डोळ्याच्या खाली चेहऱ्यावर काळे-निळे रंगाच्या जखमा झाल्या आहेत.. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत .
Post a Comment