सोमेश्वरनगर ( वार्ताहर )
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची लांबलेली पंचवार्षिक निवडणूक आज होत आहे . नवीन संचालक मंडळाचे भवितव्य आज मतदान पेटी बंद होणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षातील कारभारी कोण..? हे गुरुवारी स्पष्ट होईल. बारामती,पुरंदर ,खंडाळा व फलटण तालुक्यातील सुमारे १०० मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजलेपासुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आसून सुमारे २५८७६/- सभासद मतदानाचा अधिकार बजावतील .
सोमेश्वर सह साखर कारखाना कै मुगुटराव काकडे यानी स्थापन केला त्यानंतर १९९२ पर्यंत काकडे यांचीच निर्विवाद सत्ता होती .१९९२ नंतर अजितपवार यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर काकडे - पवार संघर्ष सुरु झाला कधी सतीश काकडे चे ४ उमेदवार बरोबर घेत तर कधी शहाजी काकडे ना अध्यक्ष करीत अजित पवार यानी कारखान्यावर आपली सत्ता कायम ठेवली दरम्यान ऊसदरासाठी सतीश काकडे यानी शेतकरी कृती समिती मार्फत संघर्ष करुन येरवडा जेल मधे देखील गेले त्यांची आंदोलने राज्यभर गाजली . दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष शहाजी काकडे ,राजवर्धन शिंदे ,पुरुषोत्तम जगताप ई नी सहविजप्रकल्प ,ईथेनॉल प्रकल्प उत्तम चालवुन राज्यात व पुणे जिल्ह्यात प्रथम दर देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली. दरम्यान पुरुषोत्तम जगतापव संचालक मंडळाला कोव्हीड मुळे साडेसहा वर्षसंधी मिळाली. कोव्हीड संपताच सुरु झालेली निवडणूक प्रक्रीया वेगाने सुरु झाल्याने रवीवारी २१ उमेदवाराची यादी अजित पवार गटाने जाहीर केली त्यांच्या मार्गदर्शनखाली संभाजी होळकर , पुरुषोत्तम जगताप ,राजवर्धन शिंदे व तरुण उमेदवारानी प्रचारयंत्रणा पाच दिवस सांबाळली रवीवारी अजित पवार यानी सांगता सभा घेत वाघळवाडी सह ईतर ठिकाणी उमेदवारी न मिळालेल्या नाराज उमेदवाराना ईतर संस्थामधे पदे देण्याचे आश्वासन दिले . भारतीय जनता पार्टी ने पुणे जिल्हा बाजार समिती सदस्य दिलीप खैरे यांच्या पुढाकाराने २० उमेदवार जाहीर केले ब वर्गातुन उमेदवार न दिल्याने राष्ट्रवादी चे उमेदवार संग्राम सोरटे बिनविरोध आले . मात्र उर्वरीत २० उमेदवारात लढत होणार असुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवारानी देखील घरटी प्रचार करण्याचे तंत्र अवलंबले आहे .
अजित पवार यानी सांगता सभेत नाराज उमेदवाराना आश्वासन दिल्याने व पवाराना कायम प्रबळ ठरलेला विरोधक काकडे गटातील सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजीत काकडे याना उमेदवारी दिल्याने काकडे चा विरोध मावळला आहे .त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी ला सोपी झाली आहे . तरीही नाराजांची नाराजी खरेच दुर झाली का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .१४ तारखेला मतमोजणी होणार असुन मतदान मतपत्रिका द्वारे होणार आहे .
Post a Comment