मोरगाव / बारामती  : 
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथील भाद्रपद यात्रा उत्सव मंगळवार  दि.७   ते  शनिवार दि . ११ या काळात संपन्न होणार आहे . यात्रा काळात केवळ  पुजा पाठ  , नैवद्य , मंत्रपाठ आदी  धार्मिक विधी संपन्न संपन्न होणार  आहे . कोरोनामुळे  शासनाच्या आदेशानुसार मंदिर  बंद असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही मुक्तद्वार दर्शनाचा भावीकांना लाभ घेता येणार नसल्याची माहीती चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.


 दरवर्षी भाद्रपद महीन्यामधील  शुद्ध प्रतीपदा  ते शुद्ध पंचमी या दरम्यान मोरगांवचा  उत्सव  संपन्न होतो . या उत्सवा दरम्यान सर्व धर्मीयांना पहाटे पाच ते दुपारी १२ वाजेपर्यंत  श्रींच्या मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन मुर्तीस स्वहस्ते जलस्नान व अभीषेक पुजा करण्याची पर्वणी साधता येते. तसेच मंदीराच्या चार दिशांना असणारे धर्म , अर्थ ,  काम , मोक्ष या  द्वार मंदिरात जाऊन द्वार यात्रा  केली  जाते  . यात्रेदरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यासह  , कर्नाटक राज्यातून अनेक भक्तगण येतात.मात्र कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे राज्यशासनाने काढलेल्या  आदेशानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली असलेले मयुरेश्वर मंदिर बंद आहे . यामुळे मंदिर व परीसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे .



 यात्रा उत्सवास परवानगी नसल्याने यावर्षी दि.  ७ सप्टेंबर  ते  ११ सप्टेंबर  पर्यत केवळ धार्मिक पुजा अर्चा , नैवेद्य आदी कार्यक्रम काही मोजक्या पारंपरिक मानकऱ्यांच्या  उपस्थितीत संपन्न होणार आहे . महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा चिंचवड येथून   दि . ९  रोजी गाडीतुन येणार आहे .तसेच भाद्रपद शुद्ध प्रतीपदा ते   शुद्ध तृतीया प्रर्यंत मयुरेश्वरास भरजडीत हिरे , माणीक , मोतीयुक्त सुवर्णालंकार  चढविले जाणार आहेत .या उत्सवानिमित्त मंदिर बंद असल्याने भावीकांनी  मंदिर परीसरात न येण्याचे आवाहन केले जात आहे .


  कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात वाढू लागले आहेत . यामुळे ग्रामपंचायत व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी गणेश पुजन घरुनच करावे . तसेच मयुरेश्वर  मंदिर बंद असल्याने मंदिर परीसरात गर्दी करु नये

निलेश केदारी : सरपंच मोरगांव 

Post a Comment

Previous Post Next Post