वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी):-
      रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून पुणे जिल्हा पोलिस प्रशासनाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळत असून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळत असून ज्या कुणी अद्याप रक्तदान केले नाही त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
   पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम पोलिस  अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्तदान शिबिरे पार पडत आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे उपस्थित होते. 
    वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिस दुरक्षेत्रात रक्तदान शिबिरे सुरू असून त्यास उत्तम  प्रतिसाद मिळत असून समाजातील सर्वच स्तरातील सर्व जाती धर्मातील लोक उस्फूर्तपणे यात सहभागी होत आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान सुरू राहणार असून उर्वरित लोकांनी रक्तदानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post