वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी):
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील 32 विनापरवाना दारू विक्रेत्यांना दोन दिवस तालुक्यातून हद्दपार केले आहे. गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.दिनांक 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या दोन दिवसासाठी तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांना हद्दपार केले आहे. गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 प्रमाणे ही कारवाई केली आहे. लांडे यांनी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. नारायण शिरगावकर यांनी यासंबंधी आदेश काढले असून त्याबाबत संबंधित अवैद्य दारू विक्रेत्यांना नोटिसा बजावून दोन दिवसासाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे. काही दिवसापूर्वीच लांडे यांनी चोपडज येथील दोन सराईत गुन्हेगारांना चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत उपविभागीय प्रांताधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी नुकतेच दोन सराईत गुन्हेगारांना चार जिल्ह्यातून हद्दपार केले होते. त्यानंतर गणेश उत्सव काळात गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी अवैद्य दारू विक्रेत्यांना दोन दिवस तालुक्यातून हद्दपार केले असल्याने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
Post a Comment