मुटींं-मोढवे(प्रतिनिधि):कल्याणी भोसले-जगताप
   
श्री यशवंत प्रतिष्ठान संचलित, स्व.विद्याताई चाचर फाउंडेशन,  व समस्त ग्रामस्थ मावडी क.प. ता.पुरंदर यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. संजय सावंत यांना देवदूत पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आले. 
 डॉ.संजय सावंत सर हे कुशाग्र् व बुद्धिमान  व्यक्तिमत्व्  ते नेहमीच आपल्या वैदयकीय सेवेला महत्त्व देत अनेक वर्षांपासून तसेच  कोरोनाच्या काळातही रुग्णं सेवा करत आपलं कर्तव्यं पार पाडत आहेत.
पंडित रमाबाई सामाजिक शिक्षण संस्था, यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा मोढवे येथील अनाथ मुलांना वैद्यकीय सेवा असो, प्रशांत क्लिनिक आयोजित "सुवर्णकन्या अभियानाच्या" माध्यमातून एक आणि दोन मुलींवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या मुलींच्या नावे अनुक्रमे 10 ते 7 हजाराची ठेव पावती आणि त्या मुलीना आजन्म मोफत वैद्यकीय सेवा असो या आणि यासारख्या अनेक कामातून वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
प्रत्येक रुग्णासाठी नेहमीच काळ वेळ न बगता, कधीही जात-पात भेद-भाव न करता सदैव रुग्ण सेवेत हजर असतात.  श्रीमंत असो वा गरीब त्याचावर उपचार निदान करण्यासाठी  प्रयत्नांची पूर्ण कसोटी लावतात.  म्हणूनचं  अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हे  त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत आहेत. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळत आहे.
यावेळी मावडी गावच्या विद्यमान सरपंच सौ.सोनाली चाचर, सोमेश्वर कारखाना संचालक लालासाहेब नलावडे, श्री.संतोष देशमुख साहेब, डॉ.रामदास कुटे, श्री. पांडुरंग साळुंखे, अमोल चाचर, चंद्रकांत भामे, पोपटराव जगताप, दिपक चाचर, विनायक पांडे ग्रा.प.सदस्य, दत्ता पोटे ग्रा.प.सदस्य, बाळासाहेब जगताप ग्रा.प. सदस्य, बाप्पा चाचर, तात्या देशमुख, परशुराम शिंदे, रज्जाक शेख, सुभेदार मेजर, शरद साळुंखे निलेश शेलार, डॉ. श्वेता सावंत बोऱ्हाडे, डॉ.संकेत सावंत, मावडी मधील ग्रामस्थ, श्री यशवंत प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post