पणदरे (प्रतिनिधी) :
     शेतीला जोडधंदा म्हणून आजकाल बहुतांश लोक पशुपालन व्यवसायाला पसंती घेत आहेत. याच उद्देशाने कृषी महाविद्यालय ,बारामती येथे अंतिम वर्षात शिकणारा सौरभ अंबादास जगताप याने मानजीनगर गावामधील शेतकाऱ्यांसमवेत ग्रामीण कृषिकार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पशुपालन लसीकरण मोहीम राबवली.
       या कार्यक्रमामध्ये छोटे पशु ,मोठे पशु तसेच शेळ्या यांना वेगवेगळ्या रोगावरील लस देण्यात आली. जनावरांमधील कासदाह, लाळ्या-खुरकत , गटसर्फ यांसारख्या रोगांची लक्षणे व त्यावरील उपाय या विषयावर देखील त्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले.जनावरांमधे दोन लसीकारणांमधील कालावधी किती असावा,त्याचबरोबर लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी याबाबत त्याने शेतकऱ्यांना माहिती दिली. 
‌       या कार्यक्रमामध्ये 79 पशु आणि 16 शेळ्यांना लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी सौरभ अंबादास जगताप याला महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शेतकऱ्यांच्यावतीने त्याचे आभार मानण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post