कोऱ्हाळे बुद्रुक (प्रतिनिधी):
थोपटेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज थोपटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोपटेवस्ती येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी थोपटेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्याण गावडे, शाळेचे शिक्षक गावडे सर, संकेत डोळस, अभिजीत गेजगे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वृक्षारोपण नंतर बोलताना संतोष खांडेकर म्हणाले की, कुटुंबाप्रमाणे या झाडांची निगा राखणारा असून यापुढेही आणखी गावात झाडे लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post