माळेगाव (प्रतिनिधी) दि:०१
कृषी दिनाचे औचित्य साधून 90.8 MHz रेडिओ शारदा कृषी वाहिनी च्या माध्यमातून बारामतीचे उपविभागीय अधिकारी बालाजी ताटे यांनी शेतकऱ्यांशी तंत्र शेतीचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तसेच शेतीचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक कृषी मालावर प्रक्रिया उद्योग उभारून उद्योजक ला महत्व द्यायला हवे.
रेडिओ शारदा कृषी वाहिनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती करत असते कृषी विभागाने कृषी संजिवणी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांसाठी दिनांक 25 ते 30 जून दरम्यान विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना शेती संबंधित नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. याबरोबरच पाठी मागील वर्षाच्या रब्बी हंगामामध्ये राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर बारामती तालुक्यातील विजेत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन रेडिओ शारदा कृषी वाहिनी चे केंद्रप्रमुख सुनील शिर्शिकर यांनी केले होते.
यादरम्यान बारामती विभागाचे कृषी तंत्र अधिकारी प्रतापसिंह शिंदे तसेच रेडिओ निवेदिका रोहिणी कुचेकर आणि स्वप्नील बुधावले सौ अनिता जाधव सौ दिपाली कोळसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment