मोरगाव : बारामती तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते . कृषी विभागाचे यंदाचे  २५ हजार हेक्टरवर पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे .  या हंगामात युरीयाची मागणी अधीक असुन गेल्या १६  जुन पासून २७०० मेट्रीक ट्न युरीयाची आवक तालुक्यात करण्यात आली असल्याची माहीती  बारामती तालुका कृषी अधीकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली . 


गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील पणदरे ,माळेगाव , मोरगाव , सोमेश्र्वरनगर , सुपा , जळगाव , उंडवडी , तरडोली , मुर्टी , आदी परीसरात खरीपाची मोठ्या पेरणी होत आहे  . बागायती भागात आडसाली ऊस व मका तर पश्चिम भागात कांदा , बाजरी , सूर्यफूल , ऊस , मुग  , मटकी , सोयाबिन   आदी पिक घेतली जातात . या सर्व  पिकांसाठी  तालुक्याच्या ग्रामीण भागातून युरीयाची मागणी जास्त प्रमाणात वाढु लागली आहे . बागायती पट्ट्याच्या मानाने जिरायती भागात खत विक्रीची दुकाने कमी असल्याने उपलब्ध साठा व मागणी यांचा अद्याप तरी मेळ बसला नसल्याने युरीया खरेदीसाठी सकाळपासून रांगा लागत आहेत .


गेल्या महीन्यातील १६ जुन पासून  आज अखेरपर्यंत खाजगी व सहकारी दुकानांत २७०० मेट्रीक ट्न युरीयाची आवक झाली आहे . शेतकऱ्यांना सम प्रमाणात वाट्प होण्यासाठी एका आधारवर एक युरीया गोणी देण्यात येत असल्याची माहीती कृषी विभागाकडून करण्यात आली. 

.......................................................

Post a Comment

Previous Post Next Post