सोमेश्वर नगर (प्रतिनिधी)
बारामती तालुका मराठा ऑर्गनायझेशन च्या उपाध्यक्ष पदी विकास सावंत यांची नुकतीच निवड झाली. विकास सावंत हे मराठा ऑर्गनायझेशन या संघटनेत बऱ्याच कालावधीपासून कार्यरत असून समाजाप्रती त्यांची असणारी तळमळ व त्यांच्या कार्याची दखल घेऊन मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऋतुराज माने व उपाध्यक्ष राजवर्धन बिरजे यांच्या आदेशाने सावंत यांची नुकतीच त्यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र ही त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. निवडीनंतर विकास सावंत बोलताना म्हणाले की या निवडीने मला आणखी बळ मिळाले असून येथून पुढे मराठा ऑर्गनायझेशन चे काम पूर्ण ताकतीने करणार  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post