बारामती:  
मुंबईत बोगस लसीकरणात समावेश असलेल्या आरोपीला बारामती पोलिसांनी बारामती मध्ये अटक केली आहे. राजेश पांडे असे या आरोपीचे नाव असून बारामतीतील भिगवन रोडवरील अमृता लॉज मधून याला ताब्यात घेण्यात आले आहे. राजेश पांडे यांने मुंबईमध्ये कोरोनाची लस म्हणून भेसळयुक्त द्रव्य प्रत्येकी बाराशे 60 रुपये दराने व्यक्तींना दिले होते. कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांना मिळालेल्या माहितीनुसार राजेश पांडे हा बारामतीत असल्याचे कळाले होते. लागलीच साळुंके यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना याची कल्पना दिली. शिंदे यांनी लगेच पोलीस पथक स्थापन करून या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी भिगवन रोड वरील अमृता लॉजमध्ये असल्याची माहिती मिळाली. लगेच बारामती पोलिसांनी या आरोपीला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post