बारामती:
      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे क्रियाशील कार्यकर्ते व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्या वर काल संध्याकाळी गोळीबार झाला होता. त्यामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोवीस तासाच्या आतच 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशांत मोरे ,राहुल यादव , विनोद उर्फ टॉम मोरे, यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाने बंदूक चालवल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस आणखी कसून चौकशी करत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक ढवाण यांनी दिली.
    रविराज तावरे हे काल वडापाव स्टॉल वरून वडापाव घेऊन आपल्या ओडी गाडीमध्ये बसत असताना आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात त्यांच्या छातीला गोळी लागल्याने त्यांना बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली . पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढवाण यांनी पोलीस पथक तयार करून तपासाला सुरुवात करून घटना घडल्यानंतर सहा तासातच आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक ढवाण यांनी ही माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post