मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी तोट्यात आले आहेत . अत्यअल्प दरामुळे टोमॅटो बांधावर फेकण्याची वेळ आली असुन उत्पादनासाठी एकरी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांच्या या  लालधनाने  यंदा धोका दिला आहे.
टोमॅटोला  दरवर्षी उन्हाळ्यात चांगली मागणी असते . प्रती कॅरेट पाचशे ते सहाशे रुपयांचा भाव असतो .  यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी  उन्हाळ्यामध्ये  टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते टोमॅटो लागण ते बांधणी पर्यंत  एकरी साधारण  70 ते 80 हजार रुपये  खर्च येतो .    मात्र  यंदा  असलेल्या लॉकडाऊनमुळे  तसेच हॉटेल व्यवसाय  ,खानावळ   ,लग्नकार्य आदी  बंद असल्याने टोमॅटोला नगण्य मागणी आहे . पाचशे ते सहाशे रुपये   दराने विकले जाणारे  कॅरेट केवळ    100  ते 120 रुपये पर्यंत  विकले जात आहे .
त्यामुळे शेतकऱ्यांना  डोक्याला हात लावण्याची वेळ आलेली आहे.  या भागातील मोरगाव , तरडोली , मूर्टी , वानेवाडी , लोणी भापकर , देऊळगाव रसाळ  आदी भागातील शेतकऱ्यांनी  टोमॅटोचे झाडे उपटून बांधावर फेकली आहेत .  हमखास  उत्पादन व पैसा मिळवून देणारे हे लाल धनाचे एकरी उत्पादन  दोन हजार कॅरेटचे  निघते. तर या विक्रीतून साधारणता १० लाख रुपयांचे उत्पादन  निघते . मात्र मागणीच घटल्याने   यावर्षी शेतकरी या  लालधनाने धोक्यात आला आहे .


 

                     खर्च 
एकरी   रोप  ७०००   ,  बांधणीसाठी  काठी व  तार ७०००  , गडी मजुरी   तार ओढणे -  बांधणीसाठी  ४ हजार  , महीला मजुर टोमॅटोला सुतळी  बांधायला १२०००  ,  सुतळी  ५००० रुपये     ,   फळ लागेपर्यंत खत  रासायनिक खते २५०००  ,  शेणखत ३०००० 

Post a Comment

أحدث أقدم