बारामती तालुक्यातील झारगडवाडी, घाडगेवाडी, येथे बुधवार दि. 26/05/2021 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी दारू,गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापे टाकूण धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 2 वारस गुन्हे व 3 बेवारस गुन्हे असे एकुण 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी 3600 लिटर गावठी हातभट्टी दारू ,222 लिटर देशी दारू असा एकूण 96021 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला . गणेश शिवाजी जाधव रा. झारगडवाडी ता. बारामती जि पुणे 2) नशीब अजिनाथ भोसले रा.झारगडवाडी ता.बारामती या दोघांवर गुन्हेे दाखल करण्यात आले आहेत. सदर ची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा आयुक्त श्री कांतिलाल उमाप सो, मा संचालक अंमलबजावणी व दक्षता श्रीमती उषा वर्मा विभागीय उप-आयुक्त श्री प्रसाद सुर्वे व अधीक्षक श्री संतोष झगडे, उप अधीक्षक श्री संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. श्री विजय मनाळे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक श्री डी.बी पाटील, दुय्यम निरीक्षक श्री सागर एस भगत ,दुय्यम निरीक्षक श्रीमती पी. एन. कदम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विकास थोरात, व श्री डी. के . पाटील तसेच या कारवाईत, महिला जवान निलम धुमाळ, श्री. विजय विंचुरकर, श्री अशोक पाटील, श्री दत्तात्रय साळुंके, रसुल कादरी, व झारगडवाडी चे सरपंच नितीन शेडगे उप सरपंच वैष्णव बळी यांनी सहभाग घेतला.
झारगडवाडी व घाडगेवाडीत अवैद्य दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई l सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق