दौंड (प्रतिनिधी-संदिप आढाव)
दौंड, जि. पुणे येथे म्युकरमायक्रोसिस आजाराच्या निदानासाठी प्रथमच मोफत दंत व डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे तपासणी केलेल्या रुग्णांमधील यात कोणालाही म्युकरमायक्रोसिस ची लागण झाली नसल्याचे आढळून आले.
म्युकरमायक्रोसिस हा अत्यंत घातकी आजार असून सध्याच्या काळात प्रचंड वेगाने वाढणारा आजार आहे. या रोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णांचे जास्त हाल न होता या आजाराची वेगाने ट्रीटमेंट करून आजार बरा होऊ शकतो. लोकांना या आजाराचे निदान लवकर लक्षात येत नसल्या कारणाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दौंड येथील समाजसेवक स्वर्गीय अजय रविंद्र गौड यांच्या स्मरणार्थ दौंड च्या विद्यमान नगरसेविका सौ. हेमलता परदेशी व माजी नगरसेवक श्री. प्रविणभैय्या परदेशी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. नेत्रतज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड व दंतचिकित्सक डॉ. दिपक जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी समीर राजोपाध्ये, अनिकेत वैद्य, वैजनाथ जाधव, दिनेश फराटे, श्यामसुंदर सोनोने, निखिल शिंदे, सरिता गौड, श्रेया परदेशी, पंकज ऊंडे, मुकेश ठकवाणी, विशेष परमार, दादा काळे, आनंद गटणे इत्यादीनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق