बरमाती: पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य  रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर आज सात वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला आहे. रविराज तावरे यांना एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांना उपचारासाठी बारामतीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. माळेगाव मधील संभाजीनगर या ठिकाणी हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले आहे. याविषयी आणखी पूर्णता माहिती मिळाली नसून पोलिसांनी या संदर्भात गुप्तता पाळली आहे.

Post a Comment

أحدث أقدم