सोमेश्वर नगर: प्रतिनिधी
वानेवाडी येथील रामराजे सोसायटी च्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अजित दादा कोविड सेंटरला तरुणांकडून देवगड आंब्याचे वाटप करण्यात आले.या ठिकाणी सोमेश्वर परिसरातील रुग्ण सद्या उपचार घेत असून त्यांना सकस आहार मिळावा या हेतूने 10 पेट्या आंबे या युवकांकडून देण्यात आले. बारामतीच्या पश्चिम भागातील हे एकमेव कोविड सेंटर असल्याने आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने अनेक युवक या ठिकाणी वेगवेगळी मदत पुरवत आहेत. भविष्यात या कोविड सेंटरला आणखी मदत करणार असल्याचे यावेळी अक्षय शिंगाडे व विकास सावंत यांनी सांगितले. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषो्तम जगताप, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिखरे, महेश जगताप, हेमंत गायकवाड, विकास सावंत, गणेश शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post