.


बारामती/माळेगाव :-
 निराधार महिलेचा अंत्यविधी करुन तिन युवकांनी माणुसकीचा धर्म जोपासला असून त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. हिराबाई निवृत्ती साळवे (वय ६२ वर्ष) (रा.रमामाता नगर माळेगाव ) हि पती व मुलेबाळं नसलेली निराधार महिला पडेल ते काम करून आपली उपजीविका भागवत होती.
कोरोनाची लागण हिराबाईला देखील झाली होती. युवाशक्ती दहिहंडी संघाचे संस्थापक विशाल घोडके व अमोल भोसले यांनी तिला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अखेर कोरोनाने हिराबाईला हरविले. (दि:१७) रोजी हिराबाईचे निधन झाले.अंत्यविधी कुणी करायचा असा प्रश्न दवाखान्याच्या प्रशासनाला पडला.दवाखाना प्रशासनाने विशाल घोडके यास फोन करून अडचण सांगितली. अखेर विशाल घोडके,अमोल भोसले,प्रविण जगताप या तिन युवकांनी हिराबाईवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.



"कोरोनामुळे सख्खी माणसं परकी झाली आहेत. निराधार हिराबाई आपलीच मानुन अंत्यसंस्कार केले.यापुढे ज्यांना कोणी नसेल अशांचे देखील अंत्यसंस्कार केले जातील. शेवटी माणुसकी महत्वाची आहे"

                      विशाल घोडके 
            (संस्थापक युवाशक्ती दहिहंडी संघ)

Post a Comment

Previous Post Next Post