बारामती प्रतिनिधी:
देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बारामतीत ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सुरू केलेल्या नटराज नाट्य कला मंडळ संचलित कोविड सेंटरला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांनी 100 सॅनिटायझर बॉटल, 300 मास्क, 100 हॅन्ड ग्लोज देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच बारामतीत अन्य ठिकाणी सुरु असलेल्या कोविड सेंटरलाही येणाऱ्या काळात मदत करणार असल्याचे त्यांनी साप्ताहिक बारामती दर्पणशी बोलताना सांगितले. जगताप हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment