मांजरी बु: सध्याच्या काळात कॉम्प्युटर, लॅपटॉप युग अवतरले आहेत. बदलणाऱ्या काळासोबतच नवीन आयुधे, नवीन सामग्री, नवीन तंत्रज्ञान यांचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो. ते अपरिहार्यच आहे. तुम्हाला त्या काळाच्या बरोबर जावं लागतं. आणि काळाच्या बरोबर जाताना तुम्हाला ते तंत्रज्ञान आत्मसात लागतं. तंत्रज्ञान युगामध्ये जागतिक दर्जाचे अभियंते तयार झाले पाहिजे असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय कृषिमंत्री पदमविभूषण मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्रोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना आत्माराम जाधव बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये यंत्रोत्सव स्पर्धेच्या आयोजनामागची भुमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील रोबोटिक्स, बिग डेटा व डेटा सायन्स या संकल्पनांच्या माध्यमातून संधींचा फायदा घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील पीडीईए टीम ज्यागवॉरच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील कामगिरीचा शैलेंद्र त्रिपाठी याने आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र राठोड यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.नितीन कुंभार यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق