कोऱ्हाळे बुद्रुक (दि२८)- कोऱ्हाळे बुद्रुक मधील श्री सिद्धेश्वर ग्राम विकास गाव पॅनल आज सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पॅनलचे सर्वेसर्वा सुनील (तात्या) भगत यांनी दिली आहे. गावात केलेल्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर पॅनल पुन्हा सर्वसामान्य जनतेसमोर जाणार असल्याचे भगत यांनी यावेळी सांगितले, मागील पंचवार्षिक निवडणुकीत 15 पैकी 11 उमेदवार बहुमताने निवडून आले होते ,यावेळी सर्वच्या सर्व जागा बहुमताने जिंकू असा विश्वास सुनील (तात्या) भगत यांनी व्यक्त केला आहे. कोऱ्हाळे बुद्रुक मध्ये सिद्धेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते,आज सोमवार महादेवाचा वार असल्याने या शुभ दिवशी हे अर्ज दाखल करून पॅनल प्रचाराला सुरुवात करणार असल्याचेही भगत यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post