कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हेमंत गडकरी यांचा सत्कार बारामती तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग मामा कचरे यांच्या हस्ते हा सत्कार ग्रामसचिवालय कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बापूराव फणसे, भारत देवकाते तालुका सरचिटणीस, प्रमोद खराडे तालुका संघटन सरचिटणीस, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष ऍड. ज्ञानेश्वर माने, तालुका युवक उपाध्यक्ष राहुल खोमणे, उपाध्यक्ष विनोद खोमणे , डी.जी. माळशिकारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मामा कचरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि पत्रकार यांच्यात नेहमीच समन्वयाची भूमिका राहिली आहे या पुढील काळातही पत्रकार संघ व भारतीय जनता पक्ष यांच्यात चांगले संबंध राहतील. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे. यावेळी बोलताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी म्हणाले की मराठी पत्रकार संघाची भूमिका नेहमीच समन्यायी राहिली असून सर्व पक्षांची भूमिका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येईल.
Post a Comment