बारामती/प्रतिनिधी : सण उत्सव,दंगल सदृश कालावधीत पोलीस दलाला सहाय्य करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे अर्थातच होमगार्ड यांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर चार बंदोबस्ताचे वेतन रखडल्याने त्यांचे हाल सुरु झाले आहेत. यामुळे त्यांना वेतनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारात कि,गोड होणार हा मोठा सवाल उपस्थीत झाला आहे.पुणे जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे चार बंदोबास्तांचे वेतन थकले आहे. संचारबंदीच्या काळात सर्व सामन्य कुटुंबे मेटाकुटीला आली होती. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक विवंचनेचा सामना कारावा लागला होता. थकीत वेतनामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अशीच वेळ आज जिल्ह्यातील होमगार्ड जवानांवर आली येऊन ठेपली आहे. यामुळे आत होमगार्ड जवानांची दिवाळी अंधारत होणार कि, काय? या भीतीने होमगार्ड जवानांनी भीती व्यक्त केली आहे.राज्यातील होमगार्ड जवानांच्या वेतनाचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलेला पहायला मिळतो, राज्य शासन वारंववार त्यांच्या वेतानाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. होमगार्ड यांनी केलेल्या दोन वर्षांमधील अनेक बंदोबास्तांचे वेतन थकले आहे. यामध्येलोकसभा निवडणूक, भिमाकोरेगाव बंदोबस्त, आळंदी पालखी सोहळा, सध्या सुरु असलेला कोविड १९ मधील ३ महिन्यांचा बंदोबस्ताचे वेतन थकीत आहे.  असे अंदाजे एका जवानाचे ७५ हजार रुपये थकीत आहेत. यापैकी लोकसभा निवडणूक, आळंदी पालखी सोहळा याचे राज्य शासनाकडे मानधन थकले आहे. तर कोविड १९ मधील तीन महिन्यांचे वेतन जिल्हाधिकारी यांच्याकडून येणे बाकी आहे. या थकीत मानधनामुळे घराचा उदरनिर्वाह करायचा कसा हे प्रश्न चिन्ह त्यांच्या समोर उपस्थित होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन थकल्याने होमगार्ड जवानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सध्या पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०० होमगार्ड कार्यरत आहेत. बारामती तालुका पोलीस ठाण्याला २० होमगार्ड कार्यरत आहेत, बारामती शहर पोलीस ठाण्याला १५ होमगार्ड, तर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला ४० होमगार्ड कार्यरत आहेत. कोरोना सारख्या महामारीत पोलिसांच्या बरोबरीने रसत्यावर उतरून आपली कामगिरी बजावली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राज्यात सणउत्सव असो  किंवा दंगलसदृश वातावरण असो, निवडणुकीचा काळ असो, अथवा महाराष्ट्रात ताणतणावाचे वातावरण असो, सध्या जगावर ओढवलेल्या कोरोना सारख्या  प्रादुर्भावात प्रत्येक वेळप्रसंगी पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणे, रात्रीच्या वेळी पोलीसांसोबत गस्त घालणे, जनतेच्या सेवेत सदैव व तत्परतेने होमगार्ड जवान काम करत आहेत. मात्र,  शासनाकडे निधीची कमतरता असल्याने पोलीस विभागाला होमगार्डची सेवा थांबाविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या पैशातून होमगार्डची सेवा बजावली जात आहे. मात्र, यातीलच अनेक जवानांवर आज थकीत वेतन व काहींना काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनी केलेल्या अनेक बंदोबस्ताचे वेतन थकीत असून त्यांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक, भीमाकोरेगाव बंदोबस्त, आळंदी देवस्थान ते पंढरपूर पालखीयात्रा या ठिकाणी अथवा ताणतणाव प्रसंगी होमगार्डचे जवान बंदोबस्तासाठी कार्यरत असतात. शासनाला पुणे जिल्ह्यात एकुण ४ हजार होमगार्ड आहेत, ऑनलाईन पद्दतीने ड्यूटया लावल्या जात असल्याने त्यापैकी १ हजार ४०० जणांच्याच हाताला काम मिळत आहे, त्यामुळे इतर ३ हजार होमगार्ड यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उद्भवत असून  जवानांनी करायचे काय हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. सुधारित नियमावलीनुसार होमगार्डला प्रतिदिवस  ६७०  रुपये भत्ता दिला जात आहे. मात्र, शासनाला हवे तेव्हाच त्यांना रुजू केले जाते, ऑनलाईन ड्युटीमुळे जवान एखादे दुसरे काम करत असतो,  त्यावेळी तो त्या कामावर रुजू झाल्यास अचानक शासनस्तरातून बंदोबस्ताची ड्यूटी लागते, अशा वेळी त्यांना धड पोटभर खाताही येत नाही ना धड उपाशी राहता येत नाही. व त्यांना कोणी कामावर देखील ठेवून घेत नसल्याचे चित्र आहे. यामुळे त्यांची परवड होते. घर खर्च,दैनंदिन खर्च यासाठी उधार,उसनवार करत अनेकजण आपला घरप्रपंच चालवत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच होमगार्ड जवानांची सध्या बिकट अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे यापुढे शासनाने होमगार्ड जवानांचे महिन्याला वेतन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दिवाळीच्या तोंडावर जवानांचे वेतन जमा करून त्यांची दिवाळी गोड करणे अपेक्षित आहे.
 
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post