वडगाव निंबाळकर- पुणे जिल्ह्यात सराफावर दिवसा दरोडे टाकून धुडगूस घालणारी टोळी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या वेशात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी सराफांच्या दुकानावर दिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी शिताफीने आज अटक केली आहे.
चंद्रकांत बाळासो लोखंडे (ढवळ, तालुका फलटण जिल्हा सातारा) निलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव बंगला, तालुका फलटण, जिल्हा सातारा) अक्षय विलास खोमणे (रा. कोराळे बुद्रुक तालुका बारामती, जिल्हा पुणे) प्रवीण प्रल्हाद राऊत (रा.चिखली तालुका इंदापूर) ज्ञानदेव माने (रा. माळशिरस जिल्हा सोलापूर) सुहास सोलवनकर (रा. वढले तालुका फलटण, जिल्हा सातारा) यांनी सदरील गुन्हे केले असून आत्तापर्यंत अक्षय खोमणे, नीलेश निकाळजे, राहुल तांबे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जवळपास चौदा गंभीर गुन्हे, चोऱ्या, केल्या आहेत. यापैकी राजगड हद्दीत व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा सराफांना या टोळीने लुटले होते. दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आप्पा माने आणि सुहास सोलवणकर हे फलटण तालुक्यातील वडले गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गोळीबार करून फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर ,धनंजय पाटील भोर,  पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, शिवाजी ननवरे, पोलीस उपनिरीक्षक शेलार, कवितके ,गोरे दत्तात्रय गिरमकर, शब्बीर पठाण ,चंद्रकांत झेंडे ,अनिल काळे ,रविराज कोकरे, अभिजीत एकशिंगे ,अमोल शेडगे ,मंगेश भगत, चेतन पाटील, सुनील कोळी, दगडू विरकर, अक्षय सिताप, मारकड ,खोमणे ,ज्ञानेश्वर सानप यांनी समांतर तपास करून ही कारवाई केली. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post