वडगाव निंबाळकर (दि २९):बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये लांडे हे थोडक्यात बचावले आहेत. लांडे हे एका तपासकामी फलटण तालुक्यात गेले असता हा प्रकार घडला आहे.आरोपीने छराच्या बंदुकीतून गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात सोमनाथ लांडे यांच्याशी संपर्क साधला असता मी व्यवस्थित असून हा गोळीबार आरोपीने छऱ्याच्या बंदुकीतून केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post