बारामती प्रतिनिधी:  हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.21/11/2020 रोजी रात्री सुमारे 00.30 वा.चे सुमारास ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर शेवाळवाडी ग्रामपंचायत मांजरी फार्म, पुणे येथे मुलगा नामे अनिकेत शिवाजी घायतडक वय 19 वर्ष रा. माळवाडी हडपसर पुणे याचा धारदार शस्त्राने वार करून खून झाला होता त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. 1635/2020 भादविक 302,143,147,148,149,आर्म अॅक्ट कलम - 4( 25 ) म.पो.अॅक्ट कलम - 36(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील सौ.सपोआ कल्याणराव विधाते सौ. वपोनि बाळकृष्ण कदम सौ.पोनि.(गुन्हे) राजू अडागळे सो. यांनी हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून सूचना व व मार्गदर्शन केले.
व गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे संदर्भात आदेशित केल्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सौरभ माने व तपास पथकातील कर्मचारी यांनी घटनास्थळावरील पुराव्यांच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणे चालू केले.
सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी असे कसोशीने घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, ज्यांनी अनिकेत घायतडक यास जिवे ठार मारले आहे ते चार इसम कवडीपाट टोल नाक्याजवळ पुणे येथे आहेत.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेचच सदर ठिकाणी तपास पथकातील अधिकारी सौरभ माने व पोलीस नाईक विनोद शिवले समीर पांडुळे पोलीस शिपाई अकबर शेख शाहिद शेख प्रशांत टोणपे यांनी जाऊन आड बाजूस थांबून पाहणी केली असता ते चार इसम हे कवडीपाट टोलनाक्याजवळ थांबलेले दिसले. तेव्हा पोलिसांना मिळालेली बातमी खरी असल्याची खात्री झाली.
तेव्हा तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांना जागीच पकडून त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी वरील नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.
इसम नामे शुभम संजय मोडक वय 20 वर्ष रा. मांजरी मोरे वस्ती टकले नगर बालाजी किराणा दुकान जवळ, ता. हवेली जिल्हा पुणे बंटी तानाजी तुपे वय 23 वर्ष रा. माळवाडी आदर्श वसाहत स.नं. 165 शुभम मेडिकल जवळ ता. हवेली जिल्हा पुणे प्रतीक अशोक तांबेकर वय 21 वर्ष रा. हडपसर गाव डांगमाळी ता.हवेली जि. पुणे प्रकाश बाळू कांबळे वय 23 वर्ष रा. माळवाडी वीट भट्टी शेजारी हडपसर पुणे यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. नामदेव चव्हाण ,अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील ,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्री. बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर पोनि.(गुन्हे) राजू अडागळे यांचे सूचना प्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सौरभ माने पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे पोलीस नाईक विनोद शिवले समीर पांडुळे संदीप राठोड पोलीस शिपाई अकबर शेख शशिकांत नाळे शाहिद शेख प्रशांत टोणपे सचिन जाधव प्रशांत दुधाळ उमाकांत स्वामी यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मांजरी पोलीस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक मनोज पाटील हे करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post