माळेगावचे स्वरूप भैया वाघमोडे यांचे अपघाती निधन
माळेगाव, ता.22ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वरूप (भैया) हरिभाऊ वाघमोडे (वय 49) यांचे अपघाती निधन झाले. आज (रविवार) दुपारी दोनच्या दरम्यान वरील घटना घडली असून माळेगाव परिसरामध्ये प्रचंड शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी, दोन मुली, दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. विशेषता माळेगाव परिसरामध्ये ब्रह्मचैतन्य पतसंस्थेची स्थापना करून सामान्य लोकांना अर्थपुरवठा करीत त्यांचे प्रपंच सावरण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून केलेला आहे. कै. स्वरूप भैया हे भारतीय जनता पार्टी च्या विचाराचे होते. ते माळेगाव कारखान्याचे  माजी अध्यक्ष  व संचालक  रंजन  तावरे  यांचे खंदे समर्थक म्हणून  ओळखले जात होते. असे  असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांचा मित्र परिवार मोठा होता. कै. स्वरूप भैया यांचा अंत्यविधी वाघमोडे वस्ती येथील शिवारामध्ये होणार आहे.
....

Post a Comment

Previous Post Next Post