सचिन वाघ

कोऱ्हाळे बुद्रुक(दि१८) - वाहनचालकांनो चारचाकी घेऊन को-हाळे बुद्रुक गावात येताय तर सावधान... ! कोऱ्हाळे बुद्रुक गावामध्ये पश्चिमेकडून प्रवेश करताना किंवा गावातून बाहेर पडताना चारचाकी चालकांना मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. राधाई क्लिनिक समोर रस्त्याला दोन्ही बाजूला मोठे गुडघाभर भगदाड पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डा मधोमध घेऊन एक चाक साईड पट्टीवरून व दुसरे चाक एका दगडावरून घेऊन गाडी पुढे काढावी लागत आहे. त्यामुळे ही कला आता वाहनचालकांना शिकून घ्यावी लागेल.अन्यथा गाडी या खड्ड्यामध्ये जोरदार आदळत आहे. एका चालकाने सुद्धा या खड्ड्यामुळे आपल्या गाडीचे नुकसान झाले असल्याचे साप्ताहिक बारामती दर्पणशी बोलताना सांगितले. त्यामुळे  कोऱ्हाळे बुद्रुक मध्ये यायचे असेल तर चारचाकी चालकांना ही कला आता अवगत करावीच लागेल. कारण गेली महिनाभरापासून हा खड्डा बुजवण्यात ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने जूनमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यात कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचा सुद्धा समावेश आहे.मात्र हे प्रशासक नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळवून देण्यात सुद्धा असमर्थ ठरत आहेत हे या खड्यावरूनच दिसत आहे. त्यामुळे को-हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रशासक या रस्त्याकडे आपला मोर्चा कधी वळवतायत हाच स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना प्रश्न पडला आहे




Post a Comment

Previous Post Next Post