मोरगाव(दि१९) - नीरा मोरगाव रस्त्यावर शनिवारी दिनांक 17 रोजी ट्रक चालकाला लुटून 4 लाख 60 हजाराची रोकड लांबवण्याचा प्रकार घडला होता. मात्र पोलीस तपासात हा बनाव असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ट्रक चालकाने च हा बनाव रचून ट्रक मध्येच रक्कम लपून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजी बाळासाहेब ठोंबरे रा. गिरिम ता. दौंड, जि. पुणे असे या ट्रकचालकाचे नाव असून त्याच्यावर वडगाव पोलीस स्टेशनमध्ये भा. द. वि.कलम 407नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर हकीकत आशी की अंकुश एकनाथ खताळ रा. दौंड हे कांद्याचे व्यापारी असून त्यांनी ट्रक मधून कोल्हापूरला कांदा विक्रीसाठी पाठवला होता. कांदा विक्रीचे 3,59,486 रुपयाची पट्टी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी ट्रक चालकाबरोबर पाठवली होती. मात्र चालकाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नीरा- मोरगाव रोडवर चोरीचा बनाव करत काळ्या रंगाच्या स्कार्पिओ मधून चार इसमांनी रक्कम लूटली असल्याचे पोलिसांना सांगितले.
सदरची माहीती पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ मा . श्री अभिनव देशमुख सो , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा . श्री मिलींद मोहीते , अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग , मा.श्री नारायण शिरगावकर , उपविभागीय पोलीस अधिकारी , बारामती विभाग बारामती , तसेच पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो , यांनी आदेश देवुन संपुर्ण पुणे जिल्हयात तसेच लोणंद येथे नाकाबंदी नेमुन सदरचे स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. यानुसार परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले असता अशा वर्णनाची कोणतीही गाडी दिसून आली नाही.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कवितके यांनी अधिक तपास केला असता ही रक्कम ट्रकचालकाने ट्रक मध्ये साउंड च्या बॉक्स मध्ये लपवून ठेवली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अंकुश एकनाथ खताळ यांनी ट्रकचालका विरोधात वडगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवितके अधिक तपास करत आहेत. या घटनेचा काही तासातच वडगाव पोलिसांनी छडा लावल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
Post a Comment