बारामती(दि२५) बारामतीमध्ये काल दिवसभरात कारोनाचे 62 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 27 रुग्ण तर ग्रामीण भागातील 35 रुग्ण आहेत.
दिनांक 23/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 05 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे (24/09/20) रोजी एकूण rt-pcr 174नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 43 तर प्रतीक्षेत 01 आहे. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01 आहे. कालचे एकूण एंटीजन 80 नमुने तपासणीसाठी घेतले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह-18 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+43+18=62 झाले आहेत.यामध्ये शहरातील 27 तर ग्रामीण भागातील 35 रुग्ण आहेत.बारामतीची एकूण रूग्णसंख्या 2941 झाली आहे. तसेच एकूण बरे झालेले रुग्ण 2065 झाले आहेत व एकूण मृत्यू 71 झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले आहे .
إرسال تعليق