सचिन वाघ:
वडगाव निंबाळकर: 
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी गुरुवारी रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करत सोन्यासह रोख रक्कम लांबवली आहे. वडगाव निंबाळकर, बनकर वस्ती जाधव वस्ती, जाधव आळी या ठिकाणी मध्यरात्री जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. कोराळे परिसरात मागील एक दिवसापूर्वी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांच्या भीती निर्माण झाली होती यावेळी पोलिसांनी नागरिकांना भिऊन न जाता सतर्क राहण्याचे आव्हान केले होते. मात्र पोलिसांनी आव्हान करून एकच दिवस झाले तोच चोरट्यानीं पोलिसांनाच घरफोडी करून आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे पोलिसांची रात्री गस्तीची गाडी या भागातून जाताच दहाव्या मिनिटात घरफोडी करण्यात आली असल्याची माहिती संबंधित गावातील नागरिकांनी दिली आहे. या घटनेमध्ये पत्रकार सुनील जाधव यांच्या घरून चोरट्यांनी दीड लाखाची कॅश आणि आठ ते दहा तोळे सोने लांबवले असल्याची माहिती मिळत आहे. रात्री घडलेल्या या घटनेने वडगाव परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत अंदाजे सात ते आठ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

أحدث أقدم