बारामती(दि२४) बारामतीमध्ये काल दिवसभरात 69 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत . तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या अॅक्टिव्ह सर्वेत काटेवाडी येथे 22 रुग्ण तर नीरावागज मध्ये 1 रुग्ण असे  23  रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरातील कोरोना चा आकडा 92 पर्यंत गेला आहे.  अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
दिनांक 22/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 05 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह  आढळून आला असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत तसेच कालचे (23/09/20) एकूण rt-pcr नमुने 205 घेण्यात आले होते.   यापैकी एकूण पॉझिटिव्ह  44 तर प्रतीक्षेत 05 आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. आहेत.कालचे एकूण 97 एंटीजन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी  एकूण पॉझिटिव्ह 24 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  01+44+24=69 आढळले आहेत. यामध्ये शहरातील 28 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण आहेत.
          तसेच काल काटेवाडी व निरावागज येथे  माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घेण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वेक्षण मध्ये एकूण 199 लोकांची एंटीजेन तपासणी केली असता त्यामध्ये काटेवाडी मध्ये 22 व निरावागज येथे 1 असे एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या 2879 झालेली आहे. बारामतीत एकूण बरे झालेले रुग्ण 1934 झाले असून,एकूण मृत्यू 69 झाले आहेत.   

Post a Comment

أحدث أقدم