बारामती(दि१९) बारामतीमध्ये कोरोनाचे 95 रुग्ण आढळून आले आहेत.  जनता कर्फ्यू असून सुद्धा आज बारामतीमध्ये  95 रूग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह  आल्याने  प्रशासन सुध्दा हतबल झाले आहे.मागील पंधरा दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंभराच्या पटीत रुग्ण सापडत होते.त्यामुळे प्रशासनाने बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता याचा परिणाम थोडा फार पहायला मिळाला.  त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांचा जनता कर्फ्यू चौदा दिवसांवर वाढवला होता. आता  20 सप्टेंबरनंतर हा जनता कर्फ्यू संपत आहे.
दिनांक 17/9/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 11 नमुन्यांपैकी सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत तसेच कालचे (18/09/20) एकूण rt-pcr 250 नमुने तपासणीसाठी घेतले होते . यापैकी   एकूण पॉझिटिव्ह- 46 तर प्रतीक्षेत  03 आहेत .  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. आहेत.कालचे एकूण एंटीजन 127 नमुने घेतले होते. यापैकी एकूण पॉझिटिव्ह-35 . तसेच काल झालेल्या बारामती शहरातील ऍक्टिव्ह सर्वे मध्ये एकूण 71 जणांचे नमुने तपासले असता 14 रुग्ण एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 46+35+14=95 झाले आहेत.यामध्ये शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 38 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या-2587 झाली असून आत्तापर्यंत  एकूण बरे झालेले रुग्णांची संख्या 1290 झाली आहे.      व एकूण मृत्यू 60 झाले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. 

Post a Comment

أحدث أقدم