बारामती(दि२१) बारामतीमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही अंशता बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे . जनता कर्फ्यू असून सुद्धा बारामतीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नव्हता. मात्र जनता कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला आहे. आज सोमवारपासून बारामती सुरळीतपणे सकाळी नऊ ते रात्री सातपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत महत्त्वाच्या कामाला बाहेर पडावे व मास्क सॅनिटायजर चा वापर करावा शारीरिक अंतर ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक 19/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 19 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील सूर्य नगरी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच कालचे (20/09/20) एकूण rt-pcr 118 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी एकूण पॉझिटिव्ह 20 व प्रतीक्षेत 06 आहेत.इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. कालचे एकूण एंटीजन 43 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह05 रुग्ण आढळले आहेत.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+20+05=26 झाले आहेत. यामध्ये शहरातील 21 तर ग्रामीण भागातील 05 रुग्ण आहेत. आता बारामतीची एकूण रूग्णसंख्या 2668 झाली असून एकूण बरे झालेले रुग्ण 1432 झाले आहेत. व बारामतीत आत्तापर्यंत एकूण मृत्यू 64 झाले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे.

إرسال تعليق