पणदरे:(दि२)  दिवसेंदिवस होत असलेल्या आधुनिकीकरणाचा वापर शेतीसाठी कसा उपयोगी पडेल या उद्देशाने कृषी महाविद्यालय ,लोणी येथे अंतिम वर्षात शिकणारा विशाल राजेंद्र धायगुडे याने ग्रामीण कृषीकार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना अँप्लिकेशनच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले.
       स्मार्टफोन मध्ये शेती संबंधित अँप्लिकेशन कसे घ्यावे तसेच त्यामध्ये कशी माहिती पाहावी हे सांगितले. कृषी हवामान अंदाज,पेरणी अंदाज ,पिकांचे बियाणे तसेच वाण ,कृषी समाचार ,फळबाग ,फुलशेती , सिंचन पद्धती ,मृदा व जलसंधारण माहिती तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती संबंधित व्यवसाय यांची माहिती देऊन मोबाइलमध्ये प्रात्यक्षिक दिले .
  पिकांवरील कीड आणि रोग तसेच त्यांचे व्यवस्थापन कसे करावे आणि विविध तणनाशके ,कीडनाशके आणि बुरशीनाशके यांची माहिती दिली .
           या कार्यक्रमासाठी विशाल धायगुडे याला कृषी महाविद्यालय, लोणी चे प्राचार्य प्रा.निलेश दळे , कार्यक्रम समन्वय  प्रा.रमेश जाधव, प्रा.अमोल खडके , प्रा. आर.धसपुते, प्रा.वि.राऊत, प्रा. ए.वाळुंज, प्रा.पि. दिघे, प्रा. एस.पठारे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शेतकऱ्यांच्यावतीने त्याचे आभार मानण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post