लोणंद प्रतिनिधी / प्रशांत ढावरे
दि १०
लोणंद येथील इनरव्हील क्लब आणि अंबरनाथ हिल्स् च्या यांनी संयुक्तपणे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अविरतपणे काम करत असलेल्या पोलिस बांधवांना खजूर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांना लोणंद इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डाॅक्टर स्वाती शहा आणि इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर च्या आयएसओ स्वाती जगताप यांनी खजूर वाटप केले तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतूक केले. यावेळी लोणंद इनरव्हील क्लब च्या सेक्रेटरी शिल्पा शहा आणि क्षमा शहा यांनी स्वाती जगताप यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर च्या अध्यक्षा अंजली वारके यांचे सहकार्य लाभले.
यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी तसेच पोलिस सहकारी , इनरव्हीलच्या शानू चंद, दर्शना रावळ , बिल्कीस शेख आदि मान्यवर मास्क व सामाजिक अंतराचे भान राखत उपस्थित होत्या.
Post a Comment