बारामती : बारामतीमध्ये आज बारा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. काल एकूण 82 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 22 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे प्राप्त झालेल्या अहवालात पैकी बारामती शहरातील आठ व ग्रामीण भागातील चार असे 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व बारामतीची एकूण रुग्ण संख्या 267 झालेली आहे.तसेच काल रात्री  पंणदरे येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह  आलेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूंची संख्या 18 झालेली आहे. बारामतीतील ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शिरसुफळ येथील 2 व वंजारवाडी येथील एक आणि धुमाळवाडी येथील एक रुग्णाचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post