माळेगाव प्रतिनिधी-
बारामती तालुक्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राजे अमरसिंह काॅलनी मित्र मंडळाने आयोजित रक्तदान शिबिरात 85 जणांनी रक्तदान केल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण जगताप यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तालुक्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घ्या असे आवाहन प्रमुख ब्लड बॅकांनी केले.या आवाहनास प्रतिसाद देत गणेशोत्सव औचित्य साधून राजे अमरसिंह काॅलनी मित्र मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. यावेळी लेट माणिकबाई सराफ ब्लड बॅक बारामती यांनी रक्त संकलन केले.यावेळी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी व समाजाचे देणे लागतो या भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित केले होते असे अध्यक्ष प्रवीण जगताप यांनी सांगितले.
Post a Comment