बारामती :  बारामती मध्ये एकूण 115 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 102 जणांचा अहवाल निगेटिव्हआला असून बारामती शहरातील 11 व ग्रामीण भागातील दोन असे 13 रुग्णांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच आज दिवसभरात बारामती मध्ये एकूण 24 जणांचे  नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील 5 व ग्रामीण भागातील तीन असे आठ  रुग्णांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव आलेला आहे त्यामुळे आज दिवसभरात 13 +8 = 21 रुग्ण बारामती मध्ये आढळून आले आहेत व बारामतीची  रुग्णसंख्या 541 झाली आहे
 पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाटस रोड येथील 2, शंकर भोई गल्ली येथील चार, खंडोबा नगर येथील 2, कसबा येथील एक, सिद्धार्थ नगर येथील एक,फलटण रोड येथील एक  व ग्रामीण भागातील काटेवाडी येथील एकव वडगाव निंबाळकर येथील एक असे 13 जण rt-pcr  पॉझिटिव्ह तसेच एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  शहरातील देसाई इस्टेट येथील 2,विवेकानंद नगर येथील एक, सूर्यनगरी येथील एक व अमराई येथील एक व वडगाव निंबाळकर येथील एक, वानेवाडी येथील एक आणि गुणवडी येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post