बारामती: बारामतीमधील कालच्या उर्वरित 23 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती शहरातील एक महिला व कांबळेश्वर येथील रुग्ण असे एकूण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत व त्यातील बारामती शहरातील महिलेचा मृत्यू झालेला आहे .त्यामुळे बारामतीतील मूर्तींची संख्या 29 झालेली आहे तसेच आज बारामतीमधील खाजगी प्रयोगशाळेमध्ये  दिवसभरात घेतलेल्या 42 नमुन्यांपैकी बारामती शहरातील सहा व ग्रामीण भागातील दोन असे आठ रुग्णांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे व उर्वरित 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 566 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post