मोरगांव : मासाळवाडी ता. बारामती येथील सोमवार दि ३ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिने निमित्ताने भरवण्यात येणारी नायकोबा यात्रा कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे रद्द झाली आहे .यात्रेनिमित्त श्रींचे कऱ्हा व नीरा नदीवरील स्नान व भंडारा हा कार्यक्रम रद्द झाला आहे . यामुळे भाविकांनी मंदिर व परिसरात न येण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे .
अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील नायकोबा मंदिर यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेनिमित्त भरवण्यात येते. या यात्राकाळात श्रींस कऱ्हा नदी व नीरा नदीवर रथाद्वारे नेहुन स्नान घालण्याची गेल्या अनेक वर्षाची विशिष्ट अशी परंपरा आहे. या स्नानासाठी राज्यातील अहमदनगर, बीड, नागपूर ,नाशिक ,पुणे ,ठाणे ,सातारा, सांगली या जिल्ह्यातून हजारो भाविक -भक्त येत असतात .
दरवर्षी सुमारे दहा हजार पेक्षा अधिक भाविक यात्रेनिमित्त येतात . सध्या असणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य आजाराचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार देवस्थान यात्रा कमिटीने यात्रा रद्द केली आहे . पौर्णिमे निमित्ताने नायकोबा दर्शनासाठी न येण्याचे आवाहन भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे.
Post a Comment