मोरगांव :  मासाळवाडी ता. बारामती येथील सोमवार दि  ३ ऑगस्ट रोजी नारळी  पौर्णिने निमित्ताने भरवण्यात येणारी नायकोबा यात्रा  कोरोना या विषाणूजन्य  आजारामुळे रद्द झाली आहे .यात्रेनिमित्त  श्रींचे  कऱ्हा  व नीरा नदीवरील  स्नान व भंडारा हा कार्यक्रम रद्द झाला आहे . यामुळे  भाविकांनी मंदिर व परिसरात न येण्याचे आवाहन  यात्रा कमिटीचे भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे .
अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील नायकोबा मंदिर यात्रा दरवर्षी  श्रावण महिन्यातील पौर्णिमेनिमित्त भरवण्यात येते. या यात्राकाळात श्रींस   कऱ्हा  नदी व नीरा नदीवर रथाद्वारे नेहुन  स्नान घालण्याची गेल्या  अनेक वर्षाची विशिष्ट अशी  परंपरा आहे. या स्नानासाठी राज्यातील अहमदनगर, बीड, नागपूर ,नाशिक ,पुणे ,ठाणे ,सातारा, सांगली या जिल्ह्यातून हजारो  भाविक -भक्त येत असतात .
दरवर्षी सुमारे दहा हजार पेक्षा अधिक भाविक यात्रेनिमित्त येतात . सध्या असणाऱ्या कोरोना या  विषाणूजन्य आजाराचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी  केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार  देवस्थान यात्रा कमिटीने  यात्रा रद्द केली आहे . पौर्णिमे निमित्ताने नायकोबा दर्शनासाठी न येण्याचे आवाहन  भाऊसाहेब कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم