माळेगाव  प्रतिनिधी- 
        पर्यावरण  रक्षणासाठी  झाडे लावा  झाडे  जगवा  या घोष्यवाक्याचा  वापर करुन कब्रस्तानमधे वनराई फुलवण्याची  किमया एका मुस्लिम  युवकाने केली असुन  सिराज  मेटकरी  असे या युवकाचे  नाव आहे.
  5 जुन हा जागतिक  पर्यावरण  दिन सर्वत्र  साजरा केला जातो.शासन,अनेक  सामाजिक  संघटना व पर्यावरण  प्रेमी  यांच्या  कडून  मोठ्या  प्रमाणात  वृक्षारोपण  केले जाते.पर्यावरण  रक्षणासाठी  शासन नेहमी प्रयत्नशिल  असते.
  स्मशानभूमी व कब्रस्तान  हि सर्वसामान्यांची ना आवडती ठिकाणं.मात्र  कब्रस्तान सारख्या  ठिकाणी  वनराई  फुलवण्याची  किमया  एका ध्येयवेड्या  पर्यावरण प्रेमीने केली आहे. सिराज मेटकरी  या युवकाने  कब्रस्तानचे  रुपच  पालटवले  आहे.
  गतवर्षी  पर्यावरण  दिनाचे औचित्य साधून  सिराज  मेटकरी  यांनी  आंबा,चिंच,रेन  ट्री,सुबाभुळ,लिंब व इतर अशी  शंभराहुन  रोपे  खड्डे  घेऊन  लावली.समाजातील  काही  दानशुर  व्यक्ती कडुन  वर्गणी  गोळा  करुन  पाणीपुरवठा  करण्यासाठी  ड्रिप  बसविले. दररोज  नित्यनेमाने सकाळी पाणी  देणे,आठ दिवसांनी  खते देणे,पंधरा  दिवसांनी  आळी  साफ करणे  आदी उपाय  योजना  केल्याने  रोपांची  वाढ जोमाने  होऊ लागली.जिकडे तिकडे हिरवीगार  झाडे  दिसु  लागल्याने निसर्गाचे  रुप  आवडु  लागले.
  या कब्रस्तानमधे  दफन  विधी करताना हि झाडे  पाहुन दुःख नाहीसे होते .जवळच इदगाह  मैदान  असल्याने सामुहिक  नमाज  पठण  करताना  हिरवाई पाहुन  मन भरुन  येते. नुकतीच  या हिरवाईने  नटलेल्या  कब्रस्तानची  पहाणी  करुन  उपसरपंच  अजित  तांबोळी यांनी  समाधान  व्यक्त केले आहे. 
        
        

Post a Comment

أحدث أقدم