माळेगाव प्रतिनिधी-
माळेगाव हे वनग्राम बनविण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी एक कुटुंब एक झाड लावुन वृक्षारोपण करावे असे आवाहन सरपंच जयदीप तावरे यांनी केले. तब्बल दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतिने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जुन्या फिल्टर टॅक परिसरात वड,पिंपळ,चिंच,करंज अशी सुमारे दोनशे झाडे सरपंच जयदीप तावरे व उपसरपंच अजित तांबोळी यांच्या हस्ते लावण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी एस बी साळुंखे ,विस्तार अधिकारी सोमनाथ तावरे,सदस्य अशोक सस्ते,अविनाश तावरे,अनिल लोणकर,रोहित लोंढे,चंद्रकांत तावरे,बनसोडे सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच जयदीप तावरे म्हणाले की,पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. नुसती झाडे न लावता त्याचे रक्षण करुन झाडे जोपासली पाहिजेत.
إرسال تعليق