कोऱ्हाळे बुद्रुक -हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक येथे दोन दिवसांपूर्वी एका ९० वर्षीय जेष्ठाला कोरोनाची बाधा झाली होती. आता त्या रुग्णाच्या पत्नीला ही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोऱ्हाळेकारांची चिंता वाढली आहे.
त्या नव्वद वर्षीय रुग्णाला कोरोना झाल्याने त्याच्या जवळील संपर्कातील १२ जणांची कोरोना रोगाची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १० जणांचा तपासणी अहवाल सकाळीच निगेटिव्ह आला होता. त्यामुळे कोऱ्हाळेकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र दोन जणांचा तपासणी अहवाल येणे बाकी होते. त्यापैकी रुग्णाच्या पत्नीचा अहवाल पोसिटिव्ह आला आहे. तर इतर एक अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व सध्या पुण्यात असलेल्या त्यांच्या आठ कुटुंबियांची तपासणी पुण्यात करण्यात आली असून त्यांचा तपासणी अहवाल उद्या येणे अपेक्षित असून आता मात्र कोऱ्हाळेकरांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे
إرسال تعليق